Wednesday 28 November 2012


काळाच्या ओघांत...

काळाच्या ओघांत वर्ष अति लहान वाटते 
भावनांच्या आवेगांत त्याचे मोठे शून्य होते ।
एका लहान वर्षाला बारा महिने असतात 
बारा ह्या महिन्यांना  तीसतीस दिन असतात ।
एक एक दिवस संपूर्ण  चोवीस तासांनी होतो 
अन प्रत्येक तास  साठ मिनिटांचा असतो ।
एका छोट्या मिनिटांत  साठ सेकंद असतात 
एका अशा सेकंदात  अगणित क्षण असतात ।
तीन कोटी पंधरा लाख  सेकंदाच्या काळांत
कोटी कोटी क्षण भरून राहिले असतात ।  
दुःखिताला एकच क्षण  युगा युगाचा वाटतो 
त्या मुळेच वर्ष काळ भावनांना अनंत भासतो ।
भावनांचे हे गणित  फार वेगळे असते 
त्याच्या एका वर्षांत अनंत सांठविले असते ।।   
 रविंद्र बेंद्रे
Please click here to Watch....New Video
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/video.html


 Best मराठी कविता

कॅलेंडर

एकतीस चौकटी,बारा पाने
कॅलेंडरचे लेणे असते.
नव्या वर्षाला सोबत घेऊन
कॅलेंडरला येणे असते.

आपल्या दिशा दाखवित
भिंतीवरती टांगत रहाते.
जीवन हे क्षणभंगुर आहे
क्षणाक्षणाला सांगत रहाते.

कितीही सुया टोचल्या तरी
सा्रे सारे सोसा्यचे असते !
क्षणाक्षणाचा महोत्सव करीत
हसवा आणि हसवायचे असते !!

-सूर्यकांत डॊळसे